सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 5 मे 2018

नांदेड : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. 3) मंगाबुडी शिवारात दिघडी येथे घडली. 

नांदेड : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. 3) मंगाबुडी शिवारात दिघडी येथे घडली. 

लग्नात राहिलेला हुंडा का देत नाहीस असे म्हणून विवाहिता जबुनबी समद शेख (वय 30) हिला मागील अनेक वर्षापासून सतत त्रास देत होते. पती व सासरचा त्रास जवळपास तिने दहा वर्ष सहन केला. परंतु त्रास वाढतच जात असल्याने तिने अखेर मंगाबुडी शिवारात असलेल्या दिघडी येथील एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सासरी होणार त्रास तिने यापूर्वी आपल्या माहेरी सांगतिला होता. सासरच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार किनवट पोलिस ठाण्यात शेख गौस मगरम यांनी दिली. यावरून पती समद सालार शेख, शेख सालार, शेख शरिफा बेगम, शेख रौफ, शेख फिरोज, अमशा शेख, समरीन रौफ, अमिना आणि नजमा यांच्याविरुध्द हुंडाबळीचा व आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक चित्ते हे करीत आहेत. 

 

Web Title: married women suicide for harassment

टॅग्स