लेट पोलिस आयुक्तांमुळे बाराशे नागरिक ताटकळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - नेहमीच कार्यक्रमांना उशिरा येणाऱ्या पोलिस आयुक्तांनी रमाजान ईदनिमित्त मंगळवारी (ता. सहा) आयोजित शांतता समितीच्या बैठकीलाही उशीर केला. यामुळे तासभर सुमारे बाराशे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. एवढेच नव्हे, तर आमदार, महापौरांसह माजी खासदारांनाही आयुक्तांच्या लेटलतिफशाहीचा दुसऱ्यांदा फटका बसला. गेल्या आठवड्यात आयुक्तांना उशीर झाल्यामुळे आमदारांनी कार्यक्रम सोडल्याचा प्रकार घडला होता. 

पोलिस आयुक्तालयाचा एखादा कार्यक्रम असला, की पोलिस आयुक्त दर्जापेक्षा खालोखालचे अधिकारी वेळेवर हजर राहतात. प्रमुख पाहुणे व अन्य पाहुणेही वेळेपूर्वीच उपस्थिती लावतात; परंतु पोलिस आयुक्त तास-दीड तास उशिरा येणारच असे समीकरणच झाले आहे. ३१ मे रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्‌घाटनावेळीही आयुक्तांची आमदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार प्रदीप जैस्वाल व महापौर भगवान घडामोडे यांना वाट पाहावी लागली होती. पोलिस आयुक्तांची वाट पाहून थकलेल्या आमदार इम्तियाज जलील व संजय शिरसाट यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. यानंतर आलेले आयुक्त यशस्वी यादव यांनी कार्यक्रम उरकता घेतला. अशाच प्रकाराची आज पुनरावृत्ती झाली. रमजान व ईदनिमित्त शांतता व सलोखा बैठक सोमवारी (ता. सहा) सकाळी अकरा वाजता तापडिया नाट्यमंदिरात आयोजित  करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महापौर भगवान घडामोडे, आमदार इम्तियाज जलील, माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना बोलाविण्यात आले. वेळ अकराची असल्याने लोकप्रतिनिधी व नागरिक वेळेवर, तर काहीजण वेळेपूर्वीच उपस्थित झाले. विशेषतः पोलिस आयुक्तालयाचाच कार्यक्रम असल्याने सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारीही वेळेपूर्वीच हजर झाले; पण नेहमीप्रमाणे पोलिस आयुक्त यशस्वी यादव हेच कार्यक्रमाला वेळेवर पोचले नाहीत. त्यामुळे सर्वचजण ताटकळले. एक तास उशिराने त्यांचे आगमन झाले; मात्र तोपर्यंत नागरिक व लोकप्रतिनिधींना ताटकळत बसावे लागले. काही नागरिकांनी याबाबत उघड नाराजीही बोलून दाखविली. 

मनोगत उरकून काढता पाय...
पोलिस आयुक्तांना उशीर झाल्याने महापौरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांना एका अनाथ मुलीच्या लग्नाला आश्रमात जायचे होते. तेथे सर्वजण त्यांची वाट पाहत होते. आपल्यामुळे लग्नही थांबल्याची बाब बोलून दाखवीत त्यांनी काढता पाय घेतला.

Web Title: marthwada news aurangabad news police