बाजार समित्यांमध्ये आता मास्क कम्पलसरी 

जालना बाजार समिती.
जालना बाजार समिती.

जालना - जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबरोबरच सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. बाजार समित्यांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी शनिवारी (ता.११) दिले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू आहे. या काळात बाजार समित्यांचे कामकाज सुरू आहे.

त्यामुळे बाजार समिती येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शेतमाल खरेदी-विक्री करावा; तसेच सर्वांनी मास्कचा वापर करावा, परिसर व स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बाजार समित्यांच्या परिसरात निर्जंतुकीकरण करावे, लिलाव करताना शेतमालाचे ढीग विशिष्ट अंतरावर करावेत, गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या वेळेवर वेगवेगळ्या शेतमालाचे लिलाव करावेत, शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करावी, बाजार समित्यांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी दिले आहेत. 

शेतकऱ्यांनी संपर्क करून शेतमाल आणावा 

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल आणण्यापूर्वी बाजार समिती सचिव किंवा अडते व्यापारी यांना संपर्क करून नियोजित वेळेत व तारखेला शेतमाल विक्रीसाठी आणावा. शेतमाल विक्रीसाठी आणण्यास पोलिसांनी मुभा दिल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे. 

व्यापाऱ्यांनी ठेवावेत सॅनिटायझर 

बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवावेत अशा सूचना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत; तसेच प्रवेशद्वारावर जालना बाजार समितीच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

  • प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था 
  • परिसराचे करणार निर्जंतुकीकरण 
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच व्यवहार 
  • गर्दी टाळण्यासाठी आता वेळेचे नियोजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com