दोन लाखाचा मुद्देमाल जप्त, वीस जणांना अटक

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नांदेड : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांनी टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यात देशी दारु, हातभट्टी दारु आणि ताडी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पथकांनी वीज जणांना अटक केली. त्यात कांही महिलांचाही समावेश आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या विशेष पथकाला जिल्ह्यातील अवैध देशी दारु, हातभट्टी दारु पकडण्याच्या सुचना दिल्या.यावरून पथकांनी किनवट व माहूर भागात बुधवारी (ता. पाच) दिवसभरात वेगवेगळ्या २५ ठिकाणी कारवाई केली. यावेळी वीज दारु विक्री व हातभट्टी तयार करणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १५ लीटर देशी दारु, ६७५ लीटर ताडी, ६० लीटर हातभट्टी दारु आणि ६८० लीटर रसायन जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरणाऱ्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहे. आरोपीमध्ये काही महिलांनाही अटक केली. जिल्ह्यात अशा पध्दतीने कारवाया सुरू राहणार असल्याचे श्री. सांगडे यांनी सांगितले. 

Web Title: material of 2 lakhs are seized 20 arrested