विभागीय आयुक्‍तालयावर धडकला मातंग क्रांती मोर्चा 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला. 

औरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला. 

क्रांतीचौक येथून काढलेल्या या मोर्चात विभागातून आलेले आंदोलक हातात झेंडे, फलक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. मागासवर्गीयांवरील अन्याय- अत्याचार सातत्याने वाढत आहेत. याविरोधात या मोर्चाच्या निमित्ताने मोठा लढा उभारण्यास सुरवात केली आहे. सरकार कोणतेही असो समाज बांधवावर होणारा अन्याय वाढतच आहे. या आधुनिक युगात मनुवादी, जातीवादी वृत्ती संपलेली नाही. कोरेगाव भीमा येथील दंगलीत दोन समुहामध्ये तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र समोर आलेले आहे.

जळगाव जिल्हातील जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथे समाजाच्या तीन मुलांना तुमच्या पोहल्याने आमची विहीर बाटली म्हणत नग्न धिंड काढण्यात आली, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे समाजातील पती, पत्नीस मंदिरात दर्शनाला का आलात म्हणत गावगुडांनी मारहाण केली. 20 कुटुंबावर सामाजिक बहिस्कार टाकून गावाबाहेर काढण्यात आले. यास जबाबदार असलेल्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. 

संजय ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात डॉ. सुनील नाडे, अशोक शिरसाट, कमलेश चांदणे, सुभाष वाघुले, आनंद लोखंडे, सचिन शिंदे, संदीप चांदणे, कुणाल कांबळे, सुनील पेठे, अविनाश वाघुळे, कौसल्या गाडे, विजय वाहुळ, अनिल मगरे, सोनु नरवडे, गुल्लु वाकेकर, दीपक दाभाडे, प्रमोद तायडे, विनोद ससाणे सहभागी होते. 

या आहेत मागण्या 
- वाकडीच्या घटनेत मातंग समाजाच्या दोन्ही कुटुंबीयांचे पुनर्वसन करा 
- कोरेगाव भीमाच्या घटनेतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करून मुख्य        साक्षीदार पूजा सगट या तरुणीच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत करावी. 
- रुद्रवाडीच्या घटनेस कारणीभूत दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई 
- क्रांतिगुरू लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक त्वरित बांधावे 
- क्रांतिगुरू लहुजी साळवे आयोगाच्या 68 शिफारशींची अंमलबजावणी 
- साठे महामंडळाला दोनशे कोटींचा निधी देऊन अर्थसाहाय्य सुरू करावे

Web Title: Mathang Kranti Morcha at departmental commissioner office