नांदेडच्या राजनगर व नईआबादी येथील मटका बुकीवर छापा 

नांदेडच्या राजनगर व नईआबादी येथील मटका बुकीवर छापा 

नांदेड : शहराच्या राजनगर व नईआबादी येथील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या मटका बुकीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा २० हजाराचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास केली. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार तसेच गांजा विक्री आणि अवैध देशी दारु विक्रीसह सिंदी विक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. नई आबादी, शिवाजीनगर, लालवाडी परिसर, रेल्वेमार्ग, राजनगर, नविन मोंढा परिसरात अवैध धंदे चालत असल्याचे मागील पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येते. मात्र या बाबीकडे स्थानिक पोलिस दुर्लक्ष करतात. वरिष्ठांनी कान टोचताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकानी राजनगर व नई आबादी भागात चालणाऱ्या बुकींवर छापा टाकला. 

बुकी चालकासह पाच जणांना अटक

यावेळी त्यांनी या मटका अड्ड्यावरून बुकी चालक शेख फिरोज, विनोद गंगाधर सकत, अमोल सुभाष हत्तीअंबीरे, सोहेलखान शेरखान आणि मोहमद शोएब मोहम इस्माईल यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या डे मिलन व टाईम बाजार या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ११ हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या पाचही जणांची वरात पोलिस ठाण्यात आणली. रवि वाहूळे यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. कानगुलकर करत आहेत. 
 
नई आबादी दातार चौक येथेही मटका बुकी

तर दुसऱ्या घटनेत याच पोलिस पथकानी नई आबादी दातार चौक येथील मीलन नावाच्या मटका अड्ड्यावर शनिवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास कारवाई केली. यावेळी पोलिसांनी प्रल्हाद माणिक कांबळे, शेख रियाज शेख अयुब, वालसिंग नारायणसिंग ठाकूर, अब्दुल रहीम अब्दुल रसुल, शेख मोहमद शेख वाहेद, शेख रहीम शेख करीम आणि शेख अब्बास शेख गफुर यांना अटक केली. त्यांच्याकडून आठ हजार ७५० रुपये नगदी व मोबाईल व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. या सर्व जुगाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार संदीप गायकवाड करत आहेत.       
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com