महापौर निवडणुकीपूर्वी युतीचे नगरसेवक सहलीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांना लोणावळा येथे सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. तथापि, दोन्ही पक्षांतील प्रमुख नगरसेवक मात्र शहरातच आहेत. लोणावळा येथे गेलेले नगरसेवक आता थेट निवडणुकीच्या दिवशीच बुधवारी (ता. 14) येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष सभेत महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून भगवान (बापू) घडामोडे, कॉंग्रेसतर्फे खान अय्यूब मोहंमद हुसेनखान, "एमआयएम'तर्फे सायराबानो अजमलखान या तीन उमेदवारांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेतर्फे स्मिता घोगरे, कॉंग्रेसतर्फे अब्दुल महंमद नविद अब्दुल रशीद, एमआयएमकडून खान इर्शाद इब्राहिम यांनी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी (ता.10) शेवटचा दिवस होता. यानंतर रविवारी (ता. 11) युतीच्या नगरसेवकांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लोणावळा येथे सहलीवर पाठवले. महापालिकेत शिवसेनेचे 29 नगरसेवक होते, मात्र शीतल गादगे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आता 28 नगरसेवक राहिले आहेत, तर भाजपचे 23 नगरसेवक आहेत. यापैकी दोन्ही पक्षांचे 30 ते 35 नगरसेवक सहलीवर गेले आहेत. तथापि, प्रमुख नगरसेवक मात्र शहरातच आहेत.

Web Title: Mayor elections led Government Councillors trip