लातूरच्या महापौरांना आयुक्तांची नोटीस

pawar
pawar

लातूर : घराचे अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी भारतीय जनता पक्षाचे महापौर सुरेश पवार यांना नोटीस दिली आहे. या प्रकरणी ता. चार फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. पवार यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे, त्यामुळे त्यांना महापालिकेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवावे अशी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यावरून ही नोटीस देण्यात आली आहे. पवार आता अपात्र ठरणार का? याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

येथील मोतीनगर भागातील वीर हनमंतवाडी येथील सर्वे नंबर १८१ प्लॉट नंबर ५४, सिटी सर्वे नंबर १०१२९ व महानगरपालिका मालमत्ता क्रमांक आर ७ /९४६/६ मधील २१३.६५ चौरस मीटर क्षेत्रावर महापौर सुरेश पवार यांनी घराचे अनाधिकृतपणे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे  श्री. पवार यांना महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १० (१ ड)च्या तरतुदीनुसार कार्यवाही करून पालिका सदस्य म्हणून अपात्र करावे अशी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी आयुक्तांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेवून आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुरेश पवार यांना नोटीस दिली आहे. यासाठी ता. चार फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. आपण स्वतः किंवा आपल्या विधिज्ञामार्फत ता. चार फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून आपले मुद्देनिहाय म्हणणे मांडावे, आपल्या मार्फत कोणी उपस्थित न राहिल्यास आपेल काही म्हणणे नाही असे समजून कार्यवाही केली जाईल, असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात बांधकाम परवाना क्रमांक MC/TP/8/63/2004-2005  ता. २५ मे २००४ व बांधकाम परवाना
LMC/TP/8/265/2017-18 ता. १४ सप्टेंबर २०१७ संदर्भात उपलब्ध अभिलेखासह उपस्थित राहून संदर्भीय तक्रारीसंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६  व नगररचना नियमावलीमधील तरतुदीनुसार सदर अनाधिकृत बांधकामाबाबत म्हणणे मांडावे असे आदेशही महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांना देण्यात आले आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामवर केलेल्या कारवाईचे सर्व अभिलेखे  व दस्तासह उपस्थित रहावे, असे आदेश झोन क च्या क्षेत्रीय अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. या सुनावणीकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com