महापौर म्हणाले जोडा, महावितरणने केले तोडा

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद-वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने महापालिकेच्या शाळा, स्मशानभूमीची वीज बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. चिकलठाणा शाळेची वीज तोडल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत फोन करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र, वीज जोडण्याऐवजी कंपनीने आणखी दोन शाळांची वीज तोडून महापालिकेला झटका दिला आहे. 

महापालिका दर महिन्याला महावितरण कंपनीला कोट्यवधी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा करते. त्यात पाणीपुरवठा, पथदिवे, इमारतींच्या बिलांचा समावेश आहे. शहरातील सर्वाधिक मोठा ग्राहक महापालिका असल्याने महापालिकेला महावितरण कंपनीकडून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र आता कंपनीतर्फे 20 ते 25 हजार रुपये बिल थकले तरी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.

हेही वाचा - 

गेल्या महिन्यात महापालिका मुख्यालय, प्राणिसंग्रहालयाची वीज तोडणाऱ्या कंपनीने चार दिवसांपूर्वी महापालिकेच्या चिकलठाणा शाळेची व कांचनवाडी येथील स्मशानभूमीची वीज तोडली. त्यामुळे बुधवारी (ता.27) महापौरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर चार दिवस उलटले असले तरी चिकलठाणा शाळेची वीज जोडण्यात आलेली नाही, तर दुसरीकडे हर्सूल व विष्णूनगर येथील शाळेची वीज तोडण्यात आली. 
जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया


पुन्हा फळ्यावर शिक्षण 
चिकलठाणा शाळेत विद्यार्थ्यांना ई-लर्निंग पद्धतीने शिक्षण दिले जाते. मात्र वीजच गायब असल्याने चार दिवसांपासून पुन्हा वह्या पुस्तकांसह फळ्यावर शिकवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नगरसेवकांकडे तक्रार करून वीज जोडणी करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर नगरसेविका ज्योती नाडे यांनी महापौरांना पत्र देऊन तत्काळ वीज जोडणी करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी लेखा विभाग, विद्युत विभागाला तत्काळ बिल भरण्याचे आदेश दिले. 

शाळांची वीज तोडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना शाळांची वीज पूर्ववत करण्याची सूचना केली आहे. 
नंदकुमार घोडेले, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com