औरंगाबादेत साकारली देशातील पहिली "मयसभा'

मयसभेमधील फसवी काठी.
मयसभेमधील फसवी काठी.

औरंगाबाद - महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्‍लबतर्फे देशातील पहिले "इल्युजन म्युझियम' अर्थात "मयसभा' तयार करण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर, केंद्र समन्वयक धनश्री कासार-अक्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या "मामाचा गाव' संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम विकसित केला आहे, सांगण्यात आले. मयसभेत वेगवेगळी चौदा दालने व दहा दृष्टिभ्रम करणारी चित्रे लावली आहेत. शैक्षणिक खेळ आणि कोडे यांनी भरलेले हे जादुई दालन आहे. त्रिकोण व घन-चौकोनी काचेच्या पेटीच्या एका बाजूने पाहिल्यास त्रिकोण; तर लगतच्या बाजूने घन आकारात बदललेला दिसतो. फसवा लोखंडी रॉड फिरत्या तबकडीवर बसविलेला आहे; तसेच पॅराबोला आकाराची लोखंडी तबकडी उभी केलेली आहे. यात रॉड प्लेटमधून आरपार जात असल्याने दृष्टिभ्रम होतो.

काटकोनातील दोन आरसे खऱ्या प्रतिमेच्या वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करतात. यासोबतच आभासी मुखवटा, फसवी प्रतिमा, गुरुत्वविरोधी दालन, सप्तरंगी सावली दालन, फिरणारे दालन, मुरीचे भ्रमीत विश्व, भ्रमित तबकड्या, प्रतिरूपे, विहिरीचा अमर्याद तळ, वैश्विक चक्र पाहता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com