अंबाजोगाई : वसतिगृह छतावरून पडून एमबीबीएसचा विद्यार्थी जखमी

dog.jpg
dog.jpg

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून तोल जाऊन पडल्याने वैद्यकीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. बुधवारी (ता. ११) रात्री ही घटना घडली. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

गगन सुरजभान सिंगला (वय २१, रा. पंजाब) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गगन सध्या वैद्यकीयच्या (एमबीबीएस) अंतिम वर्षात शिकत आहे. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या 'कोंढाणा वसतिगृह' इमारतीत तो राहतो. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो वसतिगृहाच्या छतावर कानात हेडफोन लावून शतपावली करत होता. यावेळी फिरताना तो अंधाऱ्या भागात कठड्याजवळ आला असता अचानक तोल जाऊन तो खाली पडला. त्यातच तो जखमी झाला. त्याचा पडल्याचा आवाज येताच इतर विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने स्वाराती रूग्णालयात दाखल केले. गगनची प्रकरती सध्या स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती गगनच्या पालकांना देण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com