नांदेड जिल्ह्यातील आठ पोलिसांना पोलिस पदक 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 24 एप्रिल 2019

नांदेड : पोलिस खात्यात प्रशंसनीय व उल्लेखनीय सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी पोलिस महासंचलक पदक देण्यात येत असते. हे पदक यावर्षी जिल्ह्यातील आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे. एक मे रोजी त्यांना हे पदक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. 

पोलिस सेवेत असतांना उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केल्या जात असतो. राज्याचे पोलिस महासंचालक एस. के. जायसवाल यांनी राज्यभरातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचलक हे पदक देऊन सन्मानीत करण्यात येते. मंगळवारी (ता. 23) जाहीर केलेल्या यादीत नांदेड जिल्ह्यातील आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पदक जाहीर झालेल्यात चालक सहाय्यक फौजदार चाँद खान जब्बराखान आणि जितेंद्रसिंग हिरासिंग सिंग यांना वीस वर्ष विनाअपघात सेवा, हवालदार मिर्झा ईब्राहीम बेग, नथु भोसले, नईमखान मैनोद्दीन, पोलिस नाईक उमाकांत दामेकर, सतीश मुधोळकर आणि सविता केळगंद्रे 15 वर्ष सेवाअभिलेख उत्तम ठेवले म्हणून त्यांना जाहीर करण्यात आला आहे. पदक जाहीर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: medals to 8 police of Nanded District