सदोष किट पुरवठा कारवाईचे स्वरूप निश्चित नाही, मंत्री अमित देशमुख यांची अजब माहिती 

उमेश वाघमारे
Wednesday, 14 October 2020

ज्य शासन किट पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार आहे, मात्र त्याचे स्वरूप निश्चित नाही, असे अजब माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे बुधवारी (ता.१४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

जालना : राज्यात कोरोना चाचणीसाठी पुरविण्यात आलेल्या किट सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर कोरोना चाचणीसाठी त्या किटचा वापर बंद केला आहे. या संदर्भात राज्य शासन किट पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार आहे, मात्र त्याचे स्वरूप निश्चित नाही, असे अजब माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे बुधवारी (ता.१४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे कारवाईचे घोंगडे भिजत राहण्याची शक्यता आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे बुधवारी (ता.१४) जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार श्री. राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

श्री. देशमुख म्हणाले, की कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तर मृत्यू दर ही आटोक्यात आला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीमधून महाराष्ट्र बाहेर पडत आहे. सध्या मास्क, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, पीपीई किटचा तुटवडा नाही. 
तसेच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या किट सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या किटचा वापर थांबविला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या संदर्भात आयसीएमआरला कळविले आहे. कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या सदोष किट पुरवठा करणाऱ्या कंपनीवर राज्य शासनाकडून कारवाई केली जाईल. परंतु, या कारवाईचे काय स्वरूप आहे, हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही, अशी अजब माहिती ही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे सदोष किट प्रकरणाच्या कारवाईचे घोंगडे भिजत राहण्याच्या मार्गवर असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Education Minister Amit Deshmukh said press conference not an action of faulty kit