औरंगाबादेतील डिस्ट्रिक्‍ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटरला मुहूर्त लागेना

योगेश पायघन
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शासकीय यंत्रणेतील राज्यातले पहिले सेंटर घाटीत
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील शासकीय यंत्रणेतील पहिले डिस्ट्रिक्‍ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर (जिल्हा त्वरित हस्तक्षेप केंद्र किंवा डीईआयसी) घाटीत उभारण्यात येणार होते. वर्षभरात या सेंटरचे काम होणे अपेक्षित होते. नवजात शिशूंपैकी 10 टक्के बालकांना कमतरता, वाढ आणि विकास यासंदर्भातील आजार असतात.

औरंगाबाद :  केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या डिस्ट्रिक्‍ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटरसह (डीईआयसी) आपत्कालीन वैद्यकीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र घाटीत "लक्ष' योजनेतून होणाऱ्या मदर ऍण्ड चाईल्ड हेल्थ विंगमध्ये (एमसीएच) प्रस्तावित करण्यात आले होते. ही विंग सार्वजनिक आरोग्य विभाग दूध डेअरीच्या जागेवर बांधण्याच्या तयारीत असल्याने ही दोन्ही केंद्रही तिथेच होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते म्हणाले. 

केंद्र शासनाने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, मानव संसाधन विकासाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) आणीबाणीच्या वैद्यकीय सेवांसाठी राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षक योजनेत प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य केंद्र उभारण्याला मान्यता दिली. त्यासाठी दिल्लीचे डॉ. जितेंद्र अरोरा, डॉ. ए. एस. अलोक व वास्तुविशारद एस. के. गौर यांनी फेब्रुवारी महिन्यात घाटीत तीन जागांची पाहणी केली होती. त्यानंतर मेडीसीन विभागाच्या शेजारील जुन्या वॉर्ड सातची जागा निश्‍चिती करण्यात आली.

देशभरात सात कौशल्य केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यातील एक केंद्र घाटी होणार आहे. त्यासाठी घाटीत 670 चौरस मीटरची जागा जुन्या वॉर्ड सात शेजारी निश्‍चित करण्यात आली. एक कोटी दहा लाखाच्या कौशल्य केंद्रात लेक्‍चर हॉल, पाच स्किल स्टेशन, फॅकल्टी रूम, दोन स्टोअर रूम, डायनिंग हॉलची रचना यात प्रस्तावित होती. या केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांसह परिचारीकांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिल्या जाणार होते. हे केंद्रही एमसीएच विंगमध्येच होईल असे सहाय्यक संचालक डॉ. गोवर्धन गायकवाड म्हणाले. 

शासकीय यंत्रणेतील राज्यातले पहिले सेंटर घाटीत
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील शासकीय यंत्रणेतील पहिले डिस्ट्रिक्‍ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर (जिल्हा त्वरित हस्तक्षेप केंद्र किंवा डीईआयसी) घाटीत उभारण्यात येणार होते. वर्षभरात या सेंटरचे काम होणे अपेक्षित होते. नवजात शिशूंपैकी 10 टक्के बालकांना कमतरता, वाढ आणि विकास यासंदर्भातील आजार असतात. दृष्टिदोष, नेत्रदोषांचे तीन महिन्यांत निदान करून उपचार केल्यास ते प्रभावी ठरतात. यासाठी डीईआयसी मराठवाड्यातील गोरगरिबांना उपयुक्त ठरणार आहे. 40 आठवड्यांपूर्वी जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये अनेकदा काही दोष अढळून येतात. तीन वर्षांपर्यंत या बाळांचे दोष, कमतरता, आजार आणि वाढीसंदर्भात लक्ष ठेवण्याचे काम या डीईआयसी केंद्रात केले जाणार आहे. या केंद्रात सेवा देण्यासाठी 16 जणांचा स्टाफही केंद्राच्या वतीने देण्यात येणार आहे. याशिवाय यंत्रसामग्रीही मिळणार आहे; मात्र अद्याप याबाबात कोणतीही उपाययोजना झाली नाही. तसेच जागेसंदर्भातील बदलाबद्ददल घाटीला कोणतीही कल्पना दिली गेली नसल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: medical facilities in Aurangabad

टॅग्स