लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात

प्रशांत बर्दापूरकर
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास शनिवारी (ता. 15) रंगेहाथ पकडण्यात आले. भावठाना (ता. अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव पांडूरंग केंद्रे व मिश्रक प्रशांत बापूराव चोटपगार हे दोघे लाचेच्या जाळ्यात अडकले. 

तालुक्यातील भावठाना आरोग्य केंद्रातील तक्रारदार कर्मचाऱ्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन थकले होते. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या मंजूर रकमेचा धनादेश वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घ्यायचा होता. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव केंद्रे याने तक्रारदारास 25 हजार रूपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा करुन शनिवारी भावठाना आरोग्य केंद्रातच सापळा रचला.

यावेळी डॉ. केंद्रे याने मिश्रक असलेल्या प्रशांत चोटपगार याच्याकडे पैसे देण्यास सांगीतले. कर्मचाऱ्याकडून लाच स्विकाताच या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, विकास मुंडे, दादासाहेब केदार, अमोल बागलाने, मनोज गदळे, चालक नदीम यांचा सहभाग होता. 

Web Title: medical officer and mishrak caught while taking bribe