वैद्यकीय अधिकाऱ्यानेच मागितली लाच, तीही व्हीस्की आणि बिअरची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

एक आयबी कंपनीची व्हिस्कीची बॉटल व तीन टुबर्ग कंपनीच्या बिअर मागवल्या होत्या. या साहित्यासह चाकूरकर याला ताब्यात घेण्यात आले. लातुरातील औसा रस्त्यावरील हॉटेल काश्मीर येथे ही कारवाई करण्यात आली.

लातूर : स्वयंमुल्य निर्धारण अहवालावर बी पॉझिटिव्ह लिहिलेला शेरा रद्द करुन ए पॉझिटिव्ह करण्यासाठी व्हिस्की आणि बिअरची लाच मागणाऱ्या निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. भालचंद्र हरिहर चाकुरकर (वय 43) असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

2018-2019 या वर्षाच्या स्वंयमुल्य निर्धारण अहवालावर सकारात्मक शेरा लिहण्याच्या कामासाठी लाचेची मागणी केली जात आहे, अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडिमे, कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी (ता. 31) रात्री उशिरा ही कारवाई केली. 

एक आयबी कंपनीची व्हिस्कीची बॉटल व तीन टुबर्ग कंपनीच्या बिअर मागवल्या होत्या. या साहित्यासह चाकूरकर याला ताब्यात घेण्यात आले. लातुरातील औसा रस्त्यावरील हॉटेल काश्मीर येथे ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical officer demands bribe in Latur