वैद्यकीय अधिकारी एसबीच्या जाळ्यात

वैद्यकीय अधिकारी एसबीच्या जाळ्यात

परभणी- जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी कंम्पाऊंडरमार्फत रूग्णाच्या नातेवाईकांकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. चतुर्भूज डॉक्टरांच्या स्वतःच्या रूग्णालयात रविवारी (ता.13) ही  कार्यवाही करण्यात आली.

तक्रारदारांने त्याच्या आईला उपचारासाठी परभणी जिल्हा रूग्णालयात भरती केले होते. तिच्या पायात रॉड टाकून शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन काळे यांनी तक्रारदाराकडे आठ हजारांची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेवून तक्रार दिली. दुसरीकडे सापळा रचून डॉ. काळे यांच्या परभणी शहरातील खासगी रूग्णलयात तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना कंम्पाऊंडर पांडूरंग डूकरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तद्नंतर एसीबीने डॉ. काळे यांना ताब्यात घेतले असून त्यांविरूद्ध नानलपेठ (परभणी) पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एसीबीचे अपर पोलिस अधीक्षक नूरमहंमद शेख, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, जमादार लक्ष्मण मुरकुटे, पोलिस शिपाई अविनाश पवार, अनिल कटारे, मुखीद, सचिन गुरसूडकर, चौधरी, टेहरे यांनी ही कार्यवाही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com