नांदेड : निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता.सात) संप पुकारला आहे. या संपात विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील 150 निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतल्याने बुधवारी (ता.सात) शासकीय आरोग्य सेवेवर चांगलाच ताण वाढला. 

नांदेड : निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता.सात) संप पुकारला आहे. या संपात विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील 150 निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतल्याने बुधवारी (ता.सात) शासकीय आरोग्य सेवेवर चांगलाच ताण वाढला. 

रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांना उपचार विभाग प्रमुख डॉक्टर्सना चांगलीच कसरत करावी लागत होती. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसाला एक हजारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना सुद्धा वेळेवर उपचार करताना डॉक्टरांना चांगलीच कसरत करावी लागत होती. वेळेवर उपचार होत नसल्याचे बघून रुग्णांच्या नातेवाईकांना नाइलाजाने खासगी रुग्णालयात जाण्याचा महागडा पर्याय निवडावा लागत होता.

संपावर असलेल्या महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेन्सिएल डॉक्टर्स संघटनेचे नांदेड जिल्हाअध्यक्ष डॉ. विशाल शेवाळे, उपाध्यक्ष संजली तडस, सचिव  अखिलेश कांबळे यांच्या उपस्थितीत सर्व निवासी डॉक्टर्सनी मिळून अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांना मागण्यांचे निवेदन दिले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवासी डॉक्टर्सचा मानधन वेळेवर करण्यात यावेत. आजारी रजा घेतल्यास वेतन कपात होऊ नये. मॅटर्निटी व आजारी डॉक्टर्सची रजा मान्य करुन रजेदरम्यान त्यांच्या मानधनात कपात होऊ नये, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवासी डॉक्टर्सच्या संप काळात रुग्णालयातील प्रोफसर, डॉक्टर्स व संबंधित विभागाचे प्रमुख डॉक्टर्सच्या माध्यमातुन रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. संपादरम्यान रुग्णांची हेळसाड होणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली आहे. निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारुन ते पुढे पाढविले जाईल. परंतु निवासी डॉक्टर्सनी संपादरम्यान गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी सहकार्य करावे.

- डॉ. चंद्रकांत मस्के, (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड)  
----------
आयएमए संघटनेचा संपाला तूर्तास स्थगिती

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.आठ) रोजी नॅशनल मेडीकल कमिशनच्या विरोधात संप पुकारण्यात आला होता. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि आयएमए संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे संप तत्पूर्ता स्थगित करण्यात आल्याची माहिती आयएमएचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश कदम यांनी माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Services have been disturb due to Strike of Doctors