डॉक्टरांच्या कचऱय़ावर जिल्हाधिकाऱयांची नजर

हरी तुगावकर
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लातूर : शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. या कचरा विल्हेवाटीची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावली जाते. पण अनेक काही जण इतर कचऱय़ातच हा जैव वैद्यकीय कचरा टाकून देतात. असे प्रकार घडू नयेत जैव वैद्यकीय कचऱयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी या करीता आता शासनाने जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे.

लातूर : शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. या कचरा विल्हेवाटीची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावली जाते. पण अनेक काही जण इतर कचऱय़ातच हा जैव वैद्यकीय कचरा टाकून देतात. असे प्रकार घडू नयेत जैव वैद्यकीय कचऱयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी या करीता आता शासनाने जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे.

जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. डॉक्टरांच्या कचऱयावर आता या समितीची नजर असणार आहे. जैव वैद्यकीय कचरा अधिनियम २०१६ अंतर्गत या कचऱयाची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे हे सांगितले आहे. मोठ्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील अशा
जैव वैद्यकीय कचऱयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. पण अनेक क्लिनिक, रुग्णालयाकडून मात्र इतर कचऱयातच हा कचरा टाकला जातो. तो नागरीकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे या अधिनिमयामची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या करीता शासनाने आता जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे.

या समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष राहणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी हे सदस्य राहणार आहेत. सदस्य सचिव म्हणून जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी असणार आहेत. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक प्रतिनिधी या समितीत असणार आहे.

या समितीची दर तीन महिन्याला बैठक घेवून आढावा घेण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी रुग्णालयालांना क्षेत्रिय भेटी देवून जैव वैद्यकीय कचऱयाची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते याची पाहणी करण्याचे अधिकारही शासनाने या समितीला दिले आहेत. त्यामुळे जैव वैद्यकीय कचऱय़ाची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट करणाऱयावर आळा बसण्यास मदत होणार आहे.

समिती काय करणार

-जैव वैद्यकीय कचरा अधिनियम २०१६ अंतर्गत नियमांची जिल्हास्तरावर योग्यरित्या अंमलबजावणी केली जाते की नाही यावर देखरेख
-मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ च्या अंमलबजावणीचा आढावा
-खासगी व शासकीय रुग्णालयाचा जैविक वैद्यकीय कचरा नोंदणीचा आढावा
-रुग्णालयात किती जैविक वैद्यक कचरा निर्माण होतो  व त्याची विल्हेवाट कशी लावली जाते याचा आढावा
-जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कॉमन ट्रीटमेंट आणि डिसपोजल फॅसॅलिटीचा आहेत की नाही याची पाहणी करणे
-जैविक वैद्यक कचऱयासंदर्भात शासकीय व खासगी रुग्णालायांच्या अडचणी दूर करणे.
-जैविक वैद्यक कचऱयाच्या साठवणूक व विल्हेवाट यासाठी परिणामकारक उपाययोजना सूचविणे, त्याची अंमलबजावणी करणे.
-क्षेत्रिय भेटी देवून पाहणी करणे.

Web Title: medical waste monitor by collector