सोयगाव तालुक्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सोयगाव : जिल्ह्यासह तालुक्यात औषधी विक्रेत्यांनी, ई-फार्मसी निर्णयाविरोधात औषधी दुकाने बंदचा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागाने या निर्णयाचा शुक्रवारी धसका घेतल्याने पुरेसा औषध साठा आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागाची यंत्रणा शुक्रवारी पहाटेच औरंगाबादेत जिल्हा परिषदेत रवाना झाली होती.

शासनाच्या ऑनलाईन औषधी विक्रीच्या निर्णयाविरोधात औषध विक्रेते रस्त्यावर उतरल्याने याचा सर्वात मोठा धसका आरोग्य यंत्रणांनी घेतला आहे. दरम्यान तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पुरेसा औषधसाठा नसल्याने बंदच्या दिवशी संबंधित यंत्रणा औरंगाबाद जिल्हा परिषदेत औषध साठ्यासाठी धडकली होती.त्यामुळे बंदच्या पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाचे अपुऱ्या औषधसाठ्याचे पिटाळ उघडे पडले.दरम्यान सोयगाव सह तालुक्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद असल्याने तालुक्यातील ग्रामीण आरोग्य शासकीय औषधसाठ्यावर अवलंबून होते.मात्र खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची प्रक्टिस बंद दरम्यान सुरूच असल्याने उपचार घेतलेले रुग्ण फक्त हातात डॉक्टरांनी दिलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन हातात घेवून फिरतांना आढळून येत होते,त्यामुळे कुणी औषध देता का औषध अशी आर्त हाक मारतांना रुग्ण आढळून आले होते.

Web Title: medicine seller on strike in soygao