esakal | अंबडला किराणासह औषधी देणार घरपोच 
sakal

बोलून बातमी शोधा

अंबड : शहरात पालिकेच्या वतीने फवारणी करताना. 

नागरिकांनी साहित्याची यादी; तसेच पाहिजे असलेली औषधी हे कळविल्यानंतर घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाला व्यापाऱ्यांतर्फे संघटनेतर्फे यादी देण्यात आली. शिवाय शहरात याबाबत माहितीही दिली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

अंबडला किराणासह औषधी देणार घरपोच 

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून किराणा समान; तसेच साहित्य देण्याचा निर्णय व्यापारी संघटने घेतला आहे. यासाठी शहरातील नागरिकांना आता घरपोच किराणा व औषधी मिळविण्यासाठी दुकानाचे, दुकानदाराचे नाव, मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. शहरात होणारी रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून घरपोच किराणा साहित्य; तसेच औषधी देण्याचा निर्णय किराणा व औषधी असोसिएशनने घेतला आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

नागरिकांनी साहित्याची यादी; तसेच पाहिजे असलेली औषधी हे कळविल्यानंतर घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाला व्यापाऱ्यांतर्फे संघटनेतर्फे यादी देण्यात आली. शिवाय शहरात याबाबत माहितीही दिली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

अंबड शहरात फवारणीला वेग 

अंबड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेच्या वतीने औषधी फवारणी करण्यात आली. पालिकेने शुक्रवारी (ता. २७) शहरातील नूतन वसाहत भागात फवारणी केली. या फवारणीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पोलिस ठाण्यात बैठक 

अंबड : येथील पोलिस ठाण्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २७) बैठक घेण्यात आली. श्री. हदगल म्हणाले, की कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा सध्याचा पर्याय आहे. नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरीच थांबावे.

हेही वाचा : ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

बैठकीला तहसीलदार राजीव शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पालिकेचे मुख्याधिकारी सागर घोलप, डॉ. जगन्नाथ तलवाडकर, डॉ. अविनाश वडगावकर, डॉ. मनोज चव्हाण, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी श्रीपाद देशपांडे यांच्यासह डॉक्टर, व्यापारी उपस्थित होते. 

loading image