स्वतंत्र लिंगायत धर्माबाबत मुंबईत लवकरच बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद - अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत स्वंतत्र लिंगायत धर्माची केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी केली. यासंबंधी लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

नागपूर येथे अधिवेशनावेळी चर्चा करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्यानंतर अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांचा महात्मा बसवेश्वर महाराजांची मूर्ती व ग्रंथाची प्रत देऊन ज्येष्ठ लेखक अशोक मेनकुदळे (यवतमाळ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उभयतांमध्ये स्वतंत्र लिंगायत धर्म; तसेच लिंगायत व वीरशैव याबाबतही चर्चा झाली. कर्नाटक सरकारने स्वंतत्र लिंगायत धर्माबाबतचा 370 पानी नागमोहन समितीचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना लिंगायत समन्वय समितीने सादर केला. यावर मुख्यमंत्र्यांनी पुढील महिन्यात मुंबई येथे संयुक्त बैठक घेऊन समिती नेमण्याबाबत विचार करू, असे आश्‍वासन दिले.

Web Title: meeting for independent lingayat society devendra fadnavis