राज्यपालांसोबत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक

हरी तुगावकर
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मंगळवारी (ता. 16) लातूरच्या दौऱयावर येत आहेत. सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने ते लातूर विमानतळावर येणार आहेत. सकाळी 10.20 वाजता येथील विवेकानंद मेडिकल अँड रिसर्च सेंटरच्या विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला ते भेट देणार आहेत.

लातूर - मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यासोबत राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या पाण्यासह इत प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीतून काही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मंगळवारी (ता. 16) लातूरच्या दौऱयावर येत आहेत. सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने ते लातूर विमानतळावर येणार आहेत. सकाळी 10.20 वाजता येथील विवेकानंद मेडिकल अँड रिसर्च सेंटरच्या विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला ते भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.50 वाजता संवेदना अपंग पुनर्वसन केंद्राला ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता राजश्री शाहू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित “उच्च शिक्षणातील नवीन आयाम” या एकदिवसीय परिषदेचे उदघाटन श्री. राव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 12.05 वाजता ते आदर्श कॉलनीत जाणार आहेत. तेथून ते शासकीय विश्राम गृहात जाणार आहेत. शासकीय विश्रामगृहात दुपारी 12.25 वाजता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष  व सदस्यासोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या पाण्यासह इतर विकासाच्या प्रश्नावर ते चर्चा करणार आहेत.

या बैठकीतून काही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.या बैठकीनंतर ते
नांदेडला जाणार आहेत.

 

Web Title: Meeting of the Marathwada Legislative Development Board with the Governor