सभेला गैरहजर राहणाऱ्या चार अधिकाऱ्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

लातूर - गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर असलेल्या चार अधिकाऱ्यांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. जिल्हा परिषदेची मंगळवारी (ता. पाच) सभा होत आहे.

त्यात पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अध्यक्षांच्या विरोधात आक्रमक होऊन महिला सदस्यांनी गेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला होता. ती सभा मंगळवारी होत असून महिला सदस्य काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेची ता. 24 जून रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेला सहा अधिकारी गैरहजर होते. यात दोन अधिकाऱ्यांनी अध्यक्षांची परवानगी घेतली होती; पण चार अधिकारी मात्र परवानगी न घेताच गैरहजर होते. यावर बरीच चर्चा झाली होती. परवानगी न घेता गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर
कारवाई करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला होता. मंगळवारी पुन्हा सर्वसाधारण सभा होत असल्याने त्यात या विषयावर चर्चा होणार हे लक्षात घेऊन प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. कागणे, शिक्षणाधिकारी संजय राठोड, समाजकल्याण अधिकारी केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बसरगेकर यांना नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. हे अधिकारी काय खुलासा देतात याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, ता. 24 जून रोजी झालेली सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर यांच्या विरोधात महिला सदस्य आक्रमक झाल्या होत्या. यातून त्यांनी सभात्याग केला होता. त्यामुळे ही सभा तहकूब झाली होती.

Web Title: Meeting notices to four officials absent