रेल्वे ब्लॉकचा काही रेल्वेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

उशिरा धावणाऱ्या गाड्या
वडगाव ते गंगाखेड दरम्यान सकाळी 10.00 ते दुपारी 13.00 वाजे पर्यंत दर मंगळवारी आणि शुक्रवारी ता. १२ जूलै, १६, १९, २३, २६, ३० जुलै, दोन ऑगस्ट, सहा, नऊ, १३, १६, २०, २३, २७, ३० ऑगस्ट, तीन सप्टेंबर, सहा, १०, १३, १७, २० आणि २४ ,सप्टेंबर पर्यंत २२ ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. 

नांदेड : वडगाव-गंगाखेड दरम्यान पी. क्यू. आर. एस. मशीन वापरून रेल्वे पटरीवरील स्लीपर्स बदलण्याकरिता दर आठवड्यात दोन दिवस म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

यामुळे पुढील प्रमाणे काही गाड्यांवर याचा परिणाम होवून गाड्या उशिरा धावतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.  

उशिरा धावणाऱ्या गाड्या
वडगाव ते गंगाखेड दरम्यान सकाळी 10.00 ते दुपारी 13.00 वाजे पर्यंत दर मंगळवारी आणि शुक्रवारी ता. १२ जूलै, १६, १९, २३, २६, ३० जुलै, दोन ऑगस्ट, सहा, नऊ, १३, १६, २०, २३, २७, ३० ऑगस्ट, तीन सप्टेंबर, सहा, १०, १३, १७, २० आणि २४ ,सप्टेंबर पर्यंत २२ ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. 

गाडी संख्या ५७५४८ पूर्णा ते हैदराबाद वडगाव रेल्वे स्थानकावरून पुढे गेल्यावर हा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

गाडी संख्या ५७५५४  आदिलाबाद ते परळी सवारी गाडी सकाळी ११.10 ते साडेबारा वाजेपर्यंत परभणी रेल्वे स्थानकावर ८० मिनिटे थांबेल ..

गाडी संख्या ५७५४० परळी ते अकोला सवारी गाडी परळी रेल्वे स्थानकावरून तिच्या नियमित वेळ दुपारी सव्वा  ऐवजी एक तास उशिरा म्हणजेच दुपारी सव्वादोन वाजता सुटेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: megablock affect on railway service in Nanded