खुलताबाद तालुक्‍यातील 58 ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द

खुलताबाद तालुक्‍यातील 58 ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः तालुक्‍यातील 58 ग्रामपंचायत सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या सदस्यांचे सदस्यपद रद्द केले आहे. त्याबाबतचा आदेश संबंधित सदस्यांना पाठविल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागासवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांनी विहित कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. तीन महिन्यांची मुदतवाढ देऊनसुद्धा सदर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 58 सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
या कारवाईअंतर्गत खुलताबाद तालुक्‍यातील सदस्यपद रद्द झालेले सदस्य पुढीलप्रमाणे ः
वेरूळ-संगीता आण्णा, जाधव, रुख्मणबाई नामदेव वाहुळे, साहेबसिंग रामचंद्र गुमलाडू.
तीसगाव- किसन मांगू राठोड, वाल्मीक ज्ञानेश्वर हिवाळे, अर्चना रवींद्र मोरे.
पिंपरी- चंपावती सुरेश महेर, सुरेश मोहनसिंग महेर, ताराबाई प्रकाश साळवे
पळसगाव- रेणुका किशोर मोरे, सुजाता भागीनाथ भालेराव, दिनेश भावलाल बोहरे, पोपट भिकी सोनवणे, निमाबाई पूनमचंद ताटू. निरगुडी बु.- मंगलबाई अशोक साळवे. कसाबखेडा- वेणूबाई साहेबसिंग जंघाळे. गल्लेबोरगाव- रेखा अंकुश शिरसाठ, मुकेश नारायण परदेशी. चिंचोली- हिरालाल कचरू सातदिवे, भीमा मांगू राठोड, मावसाळा- गयाबाई रामभाऊ सोनवणे, सूलिभंजन- राज उदयसिंग सोनेत. देवळाणा बु.-सुमनबाई विष्णू पांडव. खांडीपिंपळगाव- जयश्री शिवसिंग ठाकूर. वडोद बु.- उषाबाई संजय तुरे, आशिष श्‍याम संगवे, ऊर्मिला बाळू वैष्णव, रेखा शंकर भांडे, घोडेगाव- कमलबाई केशवदास वैष्णव. भडजी- रावसाहेब सांडू आंबे, हौसाबाई शंकर ठाकरे, अनिता रतन गवळे.
सराई-पंढरीनाथ नामदेव आंबेकर. सोनखेडा-चंद्रकला साहेबराव सोनवणे, मीरा प्रभाकर बनकर.
म्हैसमाळ- दिनेश मनोहर भारती, वंदना दत्तू गायकवाड, रेखा बबन वदरे, कोमल गोरख बनकर
टाकळी राजेराय- सुनीता राजेंद्र राठोड, कचरू लक्ष्मण म्हस्के, आशुबी मुश्‍ताक शेख, आसाराम शंकर मिसाळ, लोणी- सुदाम बाजीराव गायकवाड, मंदाबाई मुरलिधर ठोंबरे. बोडखा-केसराबाई तुकाराम पवार,
ताजनापूर- सुमनबाई शिवाजी सोनवणे, बाजारसांवगी- बापूराव नारायण काटकर, कोमल कोंडाजी गायकवाड, सुनंदाबाई भागीनाथ काटकर, राधेश्‍याम कालिदास जैस्वाल, रुख्मणबाई रंगनाथ गायकवाड, संगीता अरुण जैस्वाल, धामणगाव- विजय मनोहर शिंदे, गयाबाई उत्तम पवार, लता रामदास जातोडे,
कानडगाव-सीताबाई विठ्ठल साबळे, मृणाली अरुण जाधव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com