बीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

बीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18) दसरा मेळाव्यात होणार आहे. स्मारक, मुर्ती आणि मेळाव्याचे काम वेगात आणि अंतिम टप्प्यात असून ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे   स्मारकाचे लाेकार्पण करतील. 

संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील दसरा मेळाव्याचे हे दुसरे वर्षे आहे. मागच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी स्मारकाची घोषणा केली होती. संत भगवानबाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असतानाची 25 फुट मुर्ती या स्मारकात असेल. स्मारकाच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले असून अहमदनगर येथे मुर्ती बनविण्याचे कामही पुर्णत्वाकडे आले आहे. मंगळवारी (ता. 16) रात्री उशिरा स्मारकस्थळी मूर्ती आणून ती चबुतऱ्यावर बसविली जाईल. दरम्यान, या दुसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी असून मैदानाची सफाई झाली असून आणि व्यासपीठ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेळाव्याला महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येणार आहेत. त्यादृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांनी तयारी करत आहेत. जागोजागी चहापान - नाष्ट्याची सोय केली असून मेळावा स्थळी पार्किंगची सुविधा केली आहे. दरम्यान, मेळाव्यात पंकजा मुंडे या स्मारकाचे लोकार्पण करतील. 

Web Title: memorial of bhagwan baba is in last stage