esakal | पंतप्रधान मोदींमुळे जेवण पुरविणाऱ्यावरच उपासमारीची वेळ!
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi.jpg

पंतप्रधनांचा दौरा ठरला आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांचा सर्व लवाजमा परळीत बंदोबस्तासाठी दाखल झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना जेवण द्यायचे फर्मान सोडले. वर्षभरापूर्वी हा सगळा प्रकार झाला आणि आजपोवतो बिचारा मेसचालक पोलिस ठाणे, अधिकाऱ्यांची कार्यालये आणि अधीक्षक कार्यालयाचे या जेवणाच्या देयकासाठी उंबरठे झिजवित आहे. 

पंतप्रधान मोदींमुळे जेवण पुरविणाऱ्यावरच उपासमारीची वेळ!

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : पंतप्रधनांचा दौरा ठरला आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांचा सर्व लवाजमा परळीत बंदोबस्तासाठी दाखल झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना जेवण द्यायचे फर्मान सोडले. वर्षभरापूर्वी हा सगळा प्रकार झाला आणि आजपोवतो बिचारा मेसचालक पोलिस ठाणे, अधिकाऱ्यांची कार्यालये आणि अधीक्षक कार्यालयाचे या जेवणाच्या देयकासाठी उंबरठे झिजवित आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दहा दिवस थांबा देयक मिळेल, येवढे नेहमीचे उत्तर ऐकूण थकलेल्या आणि पोलिसांना जेवण देऊन स्वत:वरच उपासमारीची वेळ आलेल्या मेसचालकाने आता उपोषण सुरु केले आहे. मेसचालक संजय स्वामी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मायबाप सरकार गरिबाला मारु नका हो..! पोलिसांना जेवण देणे माझा गुन्हा आहे का?
तुम्हाला आम्ही वेळेवर जेवण द्यायचे पण नंतर आम्ही उपाशी मरायचे का? असा अर्थपूर्ण आशयाचा मजकूर छापून त्यांनी पाठीमागे बॅनरही लावले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी परळीत प्रचार सभा घेतली होती. सभेच्या बंदोबस्ताकरता असलेल्या पोलिसांना जेवण देण्याची सुचना अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस व निरीक्षक श्री. कदम यांनी संजय स्वामी यांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सभेदरम्यान ता. १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण दिले. त्याचे दोन लाख ६२ हजार रुपयांचे देयक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या देयकासाठी स्वामी यांनी पोलिस ठाणे, अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. पण, आठ दिवस थांबा येवढेच उत्तर त्यांना ऐकायला मिळते. त्यामुळे आता संजय स्वामी यांनी पत्नीसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.


आम्हाला अद्याप महासंचालक कार्यालयाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. आमचा नियमित पाठपुरावा सुरु आहे. अनुदान मिळताच मेसचालकाचे देयक अदा केले जाईल. - राजा रामास्वामी, पोलिस अधीक्षक बीड.

(संपादन-प्रताप अवचार)