मराठवाडा अद्याप कोरडाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली असून, मराठवाडा अद्यापही कोरडा असल्याची माहिती हवामान खात्याने गुरुवारी जाहीर केली. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच पुण्यात पुढील दोन दिवस पावसाच्या काही सरी हजेरी लावतील, असेही स्पष्ट केले आहे. 

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल महिना उलटल्यानंतरही दमदार पावसाची राज्याला प्रतीक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात 1 जून ते 5 जुलै या दरम्यान 175.2 मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. यंदा मात्र या दरम्यान 173.9 मिलिमीटर (-1 टक्का) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये ही स्थिती अजूनही गंभीर झाल्याचे चित्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसून येते. मध्य महाराष्ट्रात 28 जून ते 4 जुलै या दरम्यान सरासरीपेक्षा वजा 48 टक्के पाऊस कमी झाला आहे. मराठवाड्यात हे प्रमाण वजा 73 पर्यंत कमी झाले आहे. 

दरम्यान, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता 51 ते 75 टक्के आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांतील पावसाची ओढ यातून भरून निघेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

पुण्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावत होत्या. त्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 168.2 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी गेल्या 35 दिवसांमध्ये 182.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 14.5 मिलिमीटर जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

Web Title: Meteorological Department announced that Marathwada is still dry