लातुरात नळाला बसणार मीटर

latur
latur

लातूर : शहरात पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आत नळाला मीटर बसवण्यात येणार आहे. या संबंधी बुधवारी (ता. 6) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या संबंधीच्या मीटरच्या निविदेला मंजुरीही देण्यात आली असली तरी नागरीकाना बाजारातूनही मीटर खरेदी करून महापालिकेच्या परवानगीने ते नळाला बसवण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हा विषय चर्चीला जात आहे. यावेळेस तरी त्याची अंमलबजावणी होते का याकडे आता लक्ष लागले आहे.

लातूरला सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. रेल्वेने पाणी घेण्याची वेळही लातूरवरच आली होती. तरी देखील तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेने पाण्याच्या विषयाकडे कधीच गांभिर्याने पाहिले नाही. गेल्या पंधरा वर्षापासून शहरातील नळाला मीटर बसवण्याची केवळ चर्चा केली जात आहे. स्थायी समिती असेल किंवा सर्वसाधारण सभा असेल हा विषय आणला जातो. निर्णय होतो पण पुढे त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नाही. आता पुन्हा हा विषय ऐरणीवर घेण्यात आला आहे. यात बराच वेळ चर्चा झाली. पाणी पुरवठा सुरळीत करून नंतर मीटर बसवावे. पाणीच येत नसेल तर हवेचे मीटर बसवणार का असा प्रश्न नगरसेवक इम्रान सय्यद यांनी उपस्थित केला. मीटर बसवण्याच्या आधी पाईपलाईनची कामे पूर्ण करा, अशी मागणी नगरसेवक सपना किसवे यांनी केली. पाईपलाईनच्या कामासाठी महापालिकेत उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेवक विजय साबदे यांनी दिला. यासंबंधी महापालिकेने मागवलेल्या निविदेला मंजुरीही देण्यात आली आहे. नळाला मीटर बसवण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी जाहिर केले.

बाजारातल्या मीटरलाही मुभा
महापालिकेने मीटरचे कंत्राट दिले आहे. पैसे भरून हे मीटर नळाला बसवता येणार आहे. यात कंत्राटदाराने तीन वर्षाची गॅरंटी दिली आहे. पण ही गॅरंटी चार वर्षाची करावी अशी सूचना सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी केली आहे. यासोबतच नागरीकांना बाजारातील मीटर आणून बसवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या करीता ते मीटर भारतातील कंपनीचे असेल तर एससीआरआय संस्थेने प्रमाणित केले असावे तसेच विदेशातील मीटर असेल तर ते एमआयडी किंवा ओआयएमएल संस्थेने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. हे मीटर बसवताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

असे असणार मीटरचे दर
नळाचा प्रकार-----कंत्राटदाराचा दर(प्रति मीटर रुपये)- ---वाटाघाटीनंतरचा अंतिम दर (प्रति मीटर रुपये)
१५ एमएम-------२०९०------------------२०४८
२० एमएम------२६४०-------------------२५८७
२५ एमएम-------३८६६------------------३७८१
४० एमएम-------६७०८------------------६७०८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com