विद्युत मिटर झाडावर, 500 मिटरवरून घरगुती वीज पुरवठा

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 11 जुलै 2018

नांदेड : नविन कौठा भागातील बालाजीनगर आणि ओम गार्डन परिसरातील नागरिकांना विद्यूत मिटर दिले. मात्र हे मीटर घरांपासून 500 मीटरवर झाडांच्या खोडाला लावून वीज पुरवठा देण्यात आला. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिक विज कंपनीच्या कार्यालयात खांब रोवण्यासाठी खेटे मारून हैराण आहेत. 

बालाजीनगर, ओम गार्डन परिसरात दोन वर्षापूर्वी नागरिकांनी प्लांट घेऊन घरकाम केले. त्यावेळी अनेक प्लांट मोकळे होते. परंतु दोन वर्षात या भागात वस्ती वाढू लागली. सुरुवातीच्या नागरिकांना महावितरणकडून वीज पुरवठा देण्यात आला. चक्क खांब नसल्याने काही झाडांच्या खोडाला मीटर बांधून मोकळ्या भुखंडावर बांबु गाडून ते घरापर्यंत वीज पुरवठा देण्यात आला होता.

परंतु आता प्लांटचा मालक आल्याने ते बांबू काढा किंवा आम्ही वीज तोडतो अशी धमकी देत आहेत. तसेच पाणी, वाऱ्यामुळे बांबु वाकले असलून काही सर्वीस वायर तर रस्त्यात कोलमडून पडले आहे. या भागात वीजेचे खांब देण्यासाठी कोटेशन भरून सुध्दा महावितरण आणि कंत्राटदार या नागरिकांचे काही एक एेकावयास तयार नाहीत. अनेक वेळा या भागातील नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयात खेटे मारले. परंतु अद्याप त्यांना मिळाला नाही. या भागात विद्यूत शॉकमुळे एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी महावितरण कंपनीच जबाबदार राहिल असे या भागातील नागरिक संजय सांगवीकर, नामदेव जाधव, सुनीता गोरे, सुधीर जाधव, गणेश बिडवई, रामदेव कोतावार, मयुर काजे, आनंद शेंडे, शंकर नायलवाड, फाजगे आणि मनोज गांवडे यांनी म्हटले आहे. 

Web Title: meter on tree electricity supply from 500 meter