महानगर नियोजन समिती निवडणूक;एमआयएम नगरसेवकांची बंडखोरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

औरंगाबाद - महानगर नियोजन समितीच्या सदस्यांची ग्रामीण, मोठे नगर, लहान नगर व नगर पंचायत मतदारसंघातून निवड करण्यासाठी येत्या एक फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. चार) महापालिकेतून 23 नगरसेवकांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे. तर एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी केल्याचे सांगण्यात आले. 

महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी एक फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महापालिकेच्या 115 नगरसेवकांपैकी 19 सदस्यांची या समितीसाठी निवड केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपतर्फे प्रमोद राठोड, रामेश्‍वर भादवे, आप्पासाहेब हिवाळे, माधुरी देशमुख, राजू तनवाणी व गोकूळ मलके यांनी, तर शिवसेनेतर्फे त्र्यंबक तुपे, कमलाकर जगताप, राजू वैद्य, सीताराम सुरे, आशा निकाळजे, रावसाहेब आमले, सचिन खैरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. एमआयएमतर्फे नसरीन बेगम समद यारखान, नासेर सिद्दिकी, गंगाधर ढगे, फेरोज खान, कॉंग्रेसतर्फे अब्दुल नविद अब्दुल रशीद, अय्युबखान हुसेनखान आणि अपक्षांतर्फे कीर्ती शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. एमआयएमतर्फे अधिकृतपणे चार नगरसेवकांनी अर्ज दाखल केले असले तरी इर्शाद खान, अजीम खान व अज्जू नाईकवाडी यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी पक्षनेत्यांच्या आदेशानंतर ते माघार घेतील असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Metropolitan Planning Committee Election