PHOTOS : मिकी माऊसही आला बालकांचा खाऊ खाण्यासाठी : कुठे व कसा ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी
शनिवार, 25 जानेवारी 2020

बालमित्रांच्या आनंदनगरीमधील चिवडा, भजे, गुलाबजाम, पाणीपुरी, भेळ, गुलगुले, पापड, इडली, चणे, बटाटेवडे, पुरी-भाजी आदींचा आस्वाद शिक्षक, पालकांसोबतच चक्क मिकी माऊसनेही मनसोक्त आनंद घेतला.

नांदेड : भारतीय शिक्षण व्यवस्थेत पूर्वी गुरूच्या आश्रमात जावून शिष्याला शिक्षण घ्यावे लागत. संगीतकला, नृत्यकला, गायन कला, व्यापार ज्ञान, कृषी ज्ञान वेदाभ्यास याप्रकारच्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करावा लगत असे. जेणेकरून सर्वजाण व सर्वगुणसंपन्न असा जाणता राजा प्रजेसाठी उपलब्ध करून देणे शक्य होईल. अशाच प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण वाजेगाव शैक्षणिक बीटमध्ये देण्याचा प्रयत्न शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या प्रेरणेने दिले जात आहे. 

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रिय शाळा, वाजेगाव (ता.जि.नांदेड)

शिक्षणाच्या व्याख्यांचा अभ्यास करताना हे ध्यानात घ्यावे लागेल की, शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतीच्या आत राहून, ठरलेल्या वेळेत, दिलेले पुस्तक शिकवणे नव्हे तर बदलत्या जगात स्वावलंबी बनवत आत्मसाक्षात्कार निर्माण करणे, समाजात माणूस म्हणून राहण्यासाठी तयार करणे. तसेच केवळ माहितीवर चालणारा किंवा पोपटपंची करणारा शिष्य बनवणे नव्हे तर सजीव सृष्टीशी मिळतेजुळते करून देण्याची क्षमता निर्माण करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. 

Image may contain: one or more people, people sitting, people eating and food
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राम्हणवाडा (ता.जि.नांदेड)

वाजेगाव बिटमधील सर्वच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सहशालेय उपक्रमांतर्गत बालआनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञानही प्राप्त व्हावे, हा मुख्य उद्देश यामागील होता. कारण केवळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण होत नाही. महात्मा गांधीजींच्या विचारांप्रमाणे शिक्षण म्हणजे बालकाच्या शरीर, मन वआत्मा यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय. याचाच अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ पाठ्यपुस्तकात पूर्ण होण्यास काही मर्यादा प्राप्त होतात. या मर्यादा सहशालेय उपक्रमातून पूर्ण करणे शक्य होऊ शकते. म्हणून सहशालेय उपक्रमांचे महत्त्व अतुलनीय असेच आहे.

Image may contain: 5 people, people smiling, people sitting, child, table and outdoor
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिकुट (ता.जि.नांदेड)

वाजेगाव बिटमध्ये झालेल्या आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची विविध आकर्षक दुकाने थाटली होती. यामध्ये चिवडा, भजे, गुलाबजाम, पाणीपुरी, भेळ, गुलगुले, पापड, इडली सांबार, समोसे, चणे, बटाटेवडे, पुरी-भाजी आदींचा समावेश होता. शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनीही विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर जावून पदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. विशेष आकर्षण ठरले ते मिकी माऊसचे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथील उपक्रमशील शिक्षक मुदस्सर अहमद यांनी मिकी माऊसची वेशभूषा करून बालकांचा खाऊ खाल्ला. 

Image may contain: 7 people, people sitting, people standing and indoor
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव मिस्त्री (ता.जि.नांदेड)

Image may contain: 7 people, people eating, people sitting, child and food
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंजेगाव (ता.जि.नांदेड)

पुस्तकांसोबत व्यावहारिक ज्ञानही महत्त्वाचे 

Image may contain: 1 person, sunglasses and closeup
व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी नांदेड

‘‘आनंदनगरीतून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा- तोटा, व्यापार, नाणी- नोटा यांचा परिचय व्हावा. तसेच स्वतः केलेल्या खरी कमाईतून श्रमप्रतिष्ठा या मूल्याचे महत्त्व सुद्धा त्यांना समजावे यासाठी आनंदनगरीचे महत्त्व असते.’’
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी नांदेड.

Image may contain: 19 people, including Balu Deshmukh, people smiling, people standing and outdoor
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, वाजेगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mickey Mouse also came to eat baby food: where and how to read it, Nanded News