एमआयडीसीचे पाणी, समांतरवर आज होणार मुंबईत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

औरंगाबाद - समांतर, महापालिकेतील रिक्त असलेल्या जागांवर अधिकारी देण्यात यावेत, एमआयडीसीकडून पाच एमएलडी पाणी मिळावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिका पदाधिकारी मंगळवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत. 

महापौर नंदकुमार घोडेले यासंदर्भात म्हणाले, की राज्य शासनातर्फे मिळणारे विशेष अनुदान, रस्त्यांसाठी उर्वरित ५० कोटींचा निधी, सातारा - देवळाईसाठीच्या अमृत योजनेचे १८२ कोटी, अग्निशमनचे विभागीय कार्यालय, पन्नास खाटांचा दवाखाना, समांतर, शहराला एमआयडीसीकडून पाच एमएलडी पाणी मिळावे, आदी विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. तसेच शहरातील रस्ते, पाणी, आणि वीज या मूलभूत गरजांसह विविध विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी विनंती केली जाणार आहे, असे घोडेले यांनी सांगितले. या वेळी सभागृह नेते विकास जैन आणि माजी सभापती गजानन बारवाल हेदेखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

बन्सीले, शर्मा यांचे पुनर्वसन  
जुन्या शहरात उसळलेल्या दंगलीत अपंग जगन्नाथ बन्सीले यांचा होरपळून मृत्यू झाला; तर अन्य एका घटनेत घर जळाल्याने माजी नगराध्यक्ष शर्मा यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले. या दोन्ही कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत महापौरांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title: MIDC water discussion in mumbai