वडीगोद्रीसह राजूर येथे रास्तारोको, दूध संकलन बंद आंदोलन

उमेश वाघमारे
गुरुवार, 19 जुलै 2018

जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जालना जिल्ह्यात ठीक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. गुरुवारी (ता.19) वडीगोद्रीसह राजुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

दुधाला प्रती लिटर पाच रुपये भाव वाढ द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध संकलन बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून जाणवत आहेत. या आंदोलनच्या चौथ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.19) दुपारी वडीगोद्री येथे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच राजुर शहरातील चौफुलीवर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकार्त्यांनी सुमारे अर्धातास ठिय्या मंडला. त्यामुळे जालना जळगाव, बुलढाणा- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धातास विस्कळीत झाली होती. दरम्यान दूध दर वाढी संदर्भात शासनाने लवकर निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: milk agitation continue wadigodri rajur rastaroko