परभणीत पेटले दुध आंदोलन

कैलास चव्हाण
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी  (ता.27) दुपारी बारा वाजल्यापासून परभणी-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

परभणी- दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी  (ता.27) दुपारी बारा वाजल्यापासून परभणी-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

शासकीय दुध दरामधील दोन रुपये कपातीचा शासन निर्णय रद्द करा, दुधाचे पैसै वेळेवर द्यावेत, अनुदान वेळेवर उपलब्ध करावे, परभणी येथील शासकीय दुध केंद्रात साठवणुक क्षमता वाढविण्यात यावी, इंधन दरवाढीमुळे वाहतुक कमिशनमध्ये वाढ करुन अंतराप्रमाणे कमीशन देण्यात यावे, दुध संस्थाचचे थकीत कमीशन ताक्ताळ वाटप करावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु झाले असून आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे हे आंदोलनाचे नेतृव करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk movement started in Parbhani