#MilkAgitation शासकीय दूध केंद्रवार संकलन सुरळीत; समर्थच्या दूध संकलनात घट

उमेश वाघमारे
सोमवार, 16 जुलै 2018

जालना येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रावर रोज 9 हजार 100, माहोरा येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रावर 10 हजार 300 लिटर आणि देऊळगावराजा येथील जिजामाता दूध उत्पादक सहकारी संघ येथे तीन हजार 64 लिटर असे रोज एकूण 22 हजार 464 लिटर दुधाचे संकलन होते.

जालना - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुकारलेल्या दूध संकलन बंद ला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी (ता.16) जिल्ह्यातील शासकीय दूध शीतकरण केंद्रावर नियमीत दूध संकलन झाले. मात्र समर्थ दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाच्या दूध संकलनात सोमवारी (ता.16) घट झाली.

जालना येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रावर रोज 9 हजार 100, माहोरा येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रावर 10 हजार 300 लिटर आणि देऊळगावराजा येथील जिजामाता दूध उत्पादक सहकारी संघ येथे तीन हजार 64 लिटर असे रोज एकूण 22 हजार 464 लिटर दुधाचे संकलन होते. हे सर्व दूध जालना शासकीय दूध शीतकरण केंद्रावर प्रक्रियेसाठी येते. सोमवारी (ता.16) देखील या जालना शासकीय दूध शीतकरम केंद्रावर नेहमीप्रमाणे 22 हजार 464 लिटर दूधाचे संकलन करण्यात आले. 

दरम्यान समर्थ दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाचे रोज तीन हजार 300 ते तीन हजार 400 लिटर दूधाचे संकलन केले जाते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंदमुळे समर्थ दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ येथे सोमवारी (ता.16) एक हजार 600 लिटर दूध संकलन करण्यात आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी पुकारलेल्या दूध संकलन आंदोलनाला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MilkAgitation Government Milk Center Collection At Jalna