औरंगाबादला पोलिस संरक्षणात दूध पुरवठा

जमील पठाण
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे - नगर, औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या सर्व दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना चोख पोलीस बंदोबस्तात औरंगाबादला पोहचविण्यात आले. शासनाने दुधाला वाढीव दर देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाच रुपये अनुदान जमा करावे यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे  सोमवारपासून (ता. 16)आंदोलन सुरू केले आहे.

कायगाव (जि. औरंगाबाद) : राज्यभर दूध दरवाढीसाठी होत असलेल्या आंदोलनाचे स्वरूप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच राज्य सरकार ची केवळ बघ्याची भूमिका पाहून आंदोलनकर्ते राज्यभरात आक्रमक होत आहेत, या पार्श्वभूमीवर नगरकडून औरंगाबाद ला दूध घेऊन जाणारा टँकर कायगाव येथून पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आला. 

पुणे - नगर, औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या सर्व दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना चोख पोलीस बंदोबस्तात औरंगाबादला पोहचविण्यात आले. शासनाने दुधाला वाढीव दर देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाच रुपये अनुदान जमा करावे यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे  सोमवारपासून (ता. 16)आंदोलन सुरू केले आहे. ग्रामीण भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर दूध नेण्याचे बंद केले आहेत. गायी, म्हशीचे दूध ओतून दिले जात आहे. शेतकरी देखील आंदोलनात सक्रिय सहभागी झाले आहेत.

दूध दर वाढीसाठी आंदोलन सुरू असल्याचा आजचा चौथा दिवस आहे. गुरुवारी दुपारी कायगाव (ता.गंगापूर) येथील औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार शेतकरी संघटना यासह इतर संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी गंगापूर तहसील च्या अधिकाऱ्यांनी आंदोलन करर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलनात स्वाभिममानीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे,गुलाम अली,तालुकाध्यक्ष संपत रोडगे,प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके,किसान सेनेचे अरुण रोडगे,सुधीर बारे,सतीश चव्हाण,राजू वैद्य आदी सहभागी झाले होते.

या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे,पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आंदोलन शांततेत झाले.

Web Title: MilkAgitation Milk supply in Aurangabad