जालन्यात लाखो रूपयांचे बोगस बियाणे जप्त

उमेश वाघमारे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जालना -  शहरातील जूने जालना येथे कापसाचे बोगस बियाणे पॅकेट पॅकिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (ता.18) रात्री उशिरा छापा टाकला. यामध्ये मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता.19) पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत 64 लाख 42 हजार रूपयांचे बोगस आर. आर. बीटीच्या बियाणाचा साठा जप्त केला आहे. ही स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाने संयुक्तरित्य केली आहे.

या वेळी पोलिस अधीक्षक म्हणाले की, मिळालेल्या महितीवरुन बुधवारी (ता.18) स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाने जालना शहरातील कचेरी रोड येथील कल्पेश शांतिलाल टापर यांच्या घरी छापा टाकला. यावेळी आर. आर. बीटीचे बनावट कापूस बियाणे पॅकिंगच्या सहित्यासह साडेपाच बियाणे हजार पाकिट जप्त केले आहे. तसेच राजुर येथून आर. आर. बीटीचे कापसाचे बोगस बियाणे विक्री करणारे बाबासाहेब प्रल्हाद वाडेकर (रा. जामवाडी) व हरिदास बाजीराव निहाळ (ता. चनेगाव) या दोघांना ताब्यात घेतले. या तीन ही संवशयिता विरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी श्री. पोकळे यांनी दिली. 

दरम्यान, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांच्यासह त्यांच्या पथकाने व जिल्ह्या  कृषी अधिकारी डी. एम. तांभाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Millions of bogus seeds seized in Jalna