येडेश्वरी देवीच्या यात्रेत लाखो भावीकांची गर्दी

दिलीप गंभीरे
शनिवार, 20 एप्रिल 2019

येडेश्वरीच्या यात्रेत शनिवारी (ता. 20) लाखो भाविकांनी चुनखडीच्या रानात पालखी आल्यानंतर चुना वेचण्यासाठी गर्दी केली होती.

कळंब : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात येरमाळा (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील येडेश्वरीच्या यात्रेत शनिवारी (ता. 20) लाखो भाविकांनी चुनखडीच्या रानात पालखी आल्यानंतर चुना वेचण्यासाठी गर्दी केली होती.

येडेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी (ता. 19) सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळी येडेश्वरी देवीच्या पालखीचे मुख्य मंदिरातून चुनखडीच्या रानाकडे प्रस्थान झाले. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी फुले अंथरण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखी चुनखडीच्या रानात दाखल झाली. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चुनखडीच्या रानात जवळपास सहा ते सात लाख भाविकांनी गर्दी केली होती.

Web Title: Millions of Devotee Come together in Yedeshwari devi Yatra