औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे तीन उमेदवारांची चौथी यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील एक तर खानदेशातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
चौथ्या यादीमध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून इकबाल अहमद खान पाशा, तसेच रावेर (जि. जळगाव) मतदारसंघातून विवेक देविदास ठाकरे तर धुळे मतदार संघातून मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मान्यता दिल्यानंतर या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आता औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील मतदारसंघातून कोणाला तिकीट दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.