'एमआयएम' लढणार 85 नगरपालिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - राज्यात होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने कंबर कसली आहे. हैदराबादच्या धर्तीवर पक्षाने राज्यभरात निवडणूक लढविण्यासाठी पक्षांतर्गत सर्वेक्षण केले असून, त्यानुसार 85 नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. जनतेमधून नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय कायम राहिल्यास 20 नगरपालिकेत नगराध्यक्ष विजयी करण्याचे पक्षाचे लक्ष राहणार आहे. लातूर, सोलापूर, मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. 

महाराष्ट्रात पकड घट्ट करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोअर कमिटीची स्थापना करून प्रत्येक जिल्हा, शहरात, तालुक्‍यात कार्यकारी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यभरात कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर आता एमआयएमने नगरपालिकांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती घेण्याची जबाबदारी औरंगाबादमधील पक्षाचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांच्याकडे दिली होती. सर्वेक्षणानंतर 85 नगरपालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात एमआयएमची सर्वाधिक शक्ती मराठवाड्यात आहे. नांदेड महापालिकेत यश मिळविल्यानंतर औरंगाबादेत पक्षाची सर्वाधिक ताकद असून, येथे एक आमदार आणि 24 नगरसेवक आहेत. मराठवाड्यात दलित, मुस्लिम मतदारांची जास्त संख्या असलेल्या जवळपास 40 नगरपालिका, नगर पंचायतींवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये औरंगाबादच्या 4, जालना जिल्ह्यातील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. यात गंगापूर, बीडच्या नगरपालिकांवर जास्त जोर दिला जाणार आहे. राज्यात मराठवाडा पक्षाचा गड असल्याने मराठवाड्यातील आठही जिल्हे हे पक्षाचे टार्गेट राहणार आहे. औरंगाबादमध्ये ग्रामीण भागात पक्षाचे मोठे जाळे नसले तरीही पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी किमान दहा जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

राज्यात आम्ही नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर आमचा भर राहील. शिवाय 20 नगरपालिकेत नगराध्यक्ष विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महापालिका निवडणुकीतही आम्ही ताकदीने उतरू. 
- डॉ. गफ्फार कादरी, नेते, एमआयएम 

Web Title: MIM' fight 85 municipalities