पोलीसांच्या मदतीने दंगलीचा पुर्वनियोजित कट; इम्तियाज जलील यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद : दोन उपायुक्त, प्रभारी पोलीस आयुक्त एकाच वेळी सुट्टीवर जातात. त्याचवेळी शहरात दोन गटातील भांडणांचे दंगलीत पुनर्वसन होते. हा पुर्वनियोजीत कट होता. पोलिसांसमोर व प्रदिप जैस्वाल, खासदार चंद्रकात खैरे यांच्या उपस्थितीत या घटना घडल्या आहेत. याचे फुटेज आम्हाला मिळते तर पोलीसांना का मिळत नाही. असा सवाल आमदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत केला. 

औरंगाबाद : दोन उपायुक्त, प्रभारी पोलीस आयुक्त एकाच वेळी सुट्टीवर जातात. त्याचवेळी शहरात दोन गटातील भांडणांचे दंगलीत पुनर्वसन होते. हा पुर्वनियोजीत कट होता. पोलिसांसमोर व प्रदिप जैस्वाल, खासदार चंद्रकात खैरे यांच्या उपस्थितीत या घटना घडल्या आहेत. याचे फुटेज आम्हाला मिळते तर पोलीसांना का मिळत नाही. असा सवाल आमदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत केला. 

पुर्णवेळ पोलीस आयुक्त शहराला मिळाला असता तर हि घटना टळली असती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ती घटना टाळायची होती असे दिसत नाही. दंगलीतील फोटो व व्हिडीओचा संग्रह करत असुन लवकरच ते मुख्यमंत्र्यांकडे देऊ. त्यांनी त्यावर वेळेत कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागणार. पोलीसांना फुटेज मिळत नसेल तर त्यांनी आमच्याकडे मागावे आम्ही ते देऊ. दंगलीत फायरिंगही करणारा शिवसेनेचा परिचीत पदाधिकारी हे सिसिटीव्ही कॅमेरॅत कैद आहे. तरी पोलीसांना कारवाई करायला उशीर का लागतो आहे. ज्यांनी दंगल घडवली तेच लोक आज पोलीस आयुक्तांना दंगेखोरांवर कारवाईची मागणी करत असल्याचा प्रकार घृणास्पद असल्याचा आरोपही आमदार इम्तियाज जलिल यांनी केला. छोट्या छोट्या उद्धघाटनांना मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने फिरता मात्र दंगलीत गंभीर जखमी पोलीस अधिकाऱ्याला भेटायला व वेळ मिळत नाही. मुख्यमंत्री आले असते तर पोलीसांचे मनोबल उंचावले असते. असेही ते म्हणाले. 

पोलीसांनी एसओपी डावलली 
पोलीसांना दंगलीच्या वेळी हत्याराच्या वापराची एक 'स्टॅण्डर्ड ऑपरेटींग सिस्टीम' आहे. त्यात कंबरेच्या खाली गोळ्या मारण्याचे सांगितले आहे. मात्र पोलीसांनी फायर केलेल्या प्लास्टीक बुलेट मुळे जीव गमावलेल्या युवकाच्या छातीत घुसली. शिवाय ज्यांना या गोळ्या लागल्या त्यांना कंबरेच्या वरील भागतच लागल्या आहेत. यावरुन त्यांनी एसओपी डावलल्याचेही आमदार जलील म्हणाले.

गुलमंडीच्या नेत्यांनी नैतिकता दाखवावी 
गेल्या 68 वर्षापासुन असलेली औरंगाबाद सिल्क मिलची कापडदुकान आता पर्यंत शहरात झालेल्या मोठ्यातील मोठ्या दंगलीत हात लागला नाही. आताच कशी ती जाळल्या गेली. गुलमंडीच्या नेत्यांमध्ये नैतीकता बाकी असल्यास त्यांनी ती दुकान पुन्हा उभी करण्यास मदत करण्याचे आव्हान आमदार इम्तियाज जलिल यांनी दिले आहे.

उध्वस्थ दुकानांची करणार उभारणी 
गेल्या चाळीस वर्षापासुन शहागंजला चप्पल बुट विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायीकांची दुकाने जळुन खाक झाली. दहा दिवसांपुर्वी हि दुकाने उठवण्यासाठी व हप्ता वसुलीसाठी मागणी होत असल्याची कैफीयत या दुकानदारांनी मांडली होती. त्या दुकानांची उभारणी एमआयएम करुन देणार आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च एमआयएम करणार असुन त्यानंतरही भांडवलासाठीच्या मदत करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आमदार जलिल म्हणाले. दंगलीत निर्दोषांना न्याय मिळवुन देण्यासाठी लिगल सेल सुरु करत असुन त्यांना वकिल उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. यासाठी हेल्पलाईन नंबरही सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: mim mal Imtiyaz Jaleel says police helped aurangabad voilence