एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठोकले कचरा प्रक्रिया केंद्राला कुलूप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद : मध्यवर्ती जकातनाका परिसरात कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास विरोध करत एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रक्रिया केंद्राच्या गेटला कुलूप ठोकल्याची घटना बुधवारी (ता. 27) सकाळी घडली. 
कचराकोंडीनंतर महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका परिसरात कचरा प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी जुन्या शहरात रस्त्यावर पडणारा शेकडो टन कचरा दररोज टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत.

कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटल्यामुळे तसेच पावसामुळे माशांचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त असून, महापालिकेने येथील कचरा उचलावा अशी मागणी होत होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बुधवारी सकाळीच एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आलेल्या कचऱ्याच्या रिक्षा रोखल्या व गेटला कुलूप ठाकले. महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची मनधरणी केली, मात्र दुपारपर्यंत कुलूप उघडण्यात आले नव्हते. 

Web Title: MIM party locks the waste management center