एमआयएमचा निलंबित नगरसेवक मतीन हातकड्यासह मतदानाला

बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत असलेला नगरसेवक सय्यद मतीने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत हातकड्या घालून मतदासाठी येताना.
बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत असलेला नगरसेवक सय्यद मतीने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत हातकड्या घालून मतदासाठी येताना.

औरंगाबादः जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे. एमआयएमचे निलंबित व सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत असलेले नगरसेवक सय्यद मतीन याने देखील मतदानाचा हक्क बजावला.

औरंगाबाद तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास मतीन यास हातकड्यांसह पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी आणण्यात आले होते.  एमआयएमच्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याची चर्चा असतांनाच आज वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन थेट तुरुगांतून मतदानासाठी तहसील कार्यालयात दाखल झाला. 

काळ्या रंगाचा झब्बा, डोळ्यावर गॉगल, हातात हातकडी आणि बंदूकधारी पोलीस अशा फौजफाट्यासह मतदानाला आलेल्या मतीनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर मतीनला मतदानासाठी आणण्यात आले होते. सातत्याने पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या सय्यद मतीन यास सहा महिन्याआधी एमआयएममधून निलंबित करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास विरोध केल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात मतीन याला मारहाण केली होती. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी झाली होती. याची गंभीर दखल घेत असद्दुदीन ओवेसी यांनी मतीन याची पक्षातून हाकलपट्टी करत त्याला निलंबित केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com