मिनी घाटीत आठवडाभरात प्रसूतीची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतिगृहाचे अपूर्ण काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे प्रसूतिगृह सुरू करण्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण तपासणीसाठी पहिला स्वॅब टेस्टिंगला पाठवण्यात आला. अजून दोन स्वॅब पॉझिटिव्ह आल्यास आठवड्याभरात मिनी घाटीतही प्रसूतीची सुविधा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

प्रसूती विभाग सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मिनी घाटीत वर्दळ वाढणार असून उणिवांची जाणीवही याच दरम्यान होईल. सध्या मिनी घाटी काही प्रमाणात पाणीटंचाई, तर सहा तास भारनियमनाचा सामना करत आहे. अद्याप स्वतंत्र पाइपलाइनचे काम महापालिकेने सुरू केले नाही. तर स्वतंत्र एक्‍स्प्रेस फीडचे कामही सुरू झाले नाही. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी घाटी एकमेव रेफरल सेंटर होते. त्यामुळे घाटीत दररोजची प्रसूतीची संख्या साठवर पोचली आहे. 

केमोथेरपीची औषधी आली
औषधी पुरवठ्याअभावी रेंगाळलेल्या किमोथेरपी सेंटरला पुढच्या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी लागणाऱ्या प्रतीक्षित औषधी मिनी घाटीला प्राप्त झाली. पुढच्या आठवड्यात हे सेंटर सुरू करण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस आहे. 

एका वेळी पाच प्रसूतीची व्यवस्था
२०० खाटांच्या रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्था स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी करण्यात आली आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये एकावेळी पाच डिलिव्हरी करता येण्याची सुविधा आहे. मिनी घाटीत प्रसूती सुविधा सुरू झाल्यास रेफरल डिलेव्हरीसाठी ग्रामीण शासकीय रुग्णालये मिनी घाटीत रेफर करण्याचे संकेत आहे. 

डिलेव्हरी ओटीचा पहिला स्वॅब तपासणीसाठी घाटीत पाठवला आहे. अजून दोन स्वॅब पाठवून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रसूतीची सेवा पुढच्या आठवड्यात सुरू करता येईल. तसेच किमोथेरपी सेंटरच्या औषधीही प्राप्त झाल्याने तो विभागही आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार असा तीन दिवस सुरू करू.’’  
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: mini ghati hospital