वाॅटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्याचा दुष्काळ हटवू : खोतकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ऐतिहासिक वाॅटरग्रीड योजना राबविण्यात येत असून त्या माध्यमातून मराठवाड्याचा दुष्काळ कायम हटवू, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.

नांदेड : शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ऐतिहासिक वाॅटरग्रीड योजना राबविण्यात येत असून त्या माध्यमातून मराठवाड्याचा दुष्काळ कायम हटवू, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.

आता मराठवाडा दुष्काळमुक्त करू : मुख्यमंत्री

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा 71वा वर्धापनदिन आज संपूर्ण मराठवाड्यात साजरा होत आहे. नांदेड येथे माता गुजरीजी विसावा उद्यानाील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून त्यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे वंदन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जि. प. अध्यक्षा शांताबाई जळगावकर, आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, अमर राजूरकर, राम पाटील रातोळीकर, महापौर दीक्षा धबाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांबरोबर हितगुज केले.

प्रारंभी पोलिस दलाची मानवंदना व हुतात्म्यांना देण्यात आली. यावेळी शहर व जिल्ह्यातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister arjun khotkar speaks at Marathwada mukti sangram program