एक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय

Minister Dilip Kamble takes a stock of situation in drought hit Hingoli
Minister Dilip Kamble takes a stock of situation in drought hit Hingoli

हिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता तुम्हीच कायबी करा अशी कैफीयत संतुकपिंपरी (ता.हिंगोली) येथील महिला शेतकऱ्याने पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे मांडली. 

हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. कांबळे, खासदार ॲड. राजीव सातव, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर, भाजपानेते रामरतन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी संतुकपिंपरी (ता.हिंगोली) शिवारातील शेताला भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी महिला शेतकरी अनुसयाबाई झिपरगे यांनी शेतीतील अडचण मांडली. दोन एकर रानामधे एका एकरात कापूस लावला अन एका एकरात सोयाबीन पेरलं, मातर पावसाने समदी घाण करून टाकली. सोयाबिनला शेंगा लागण्याच्या येळेला पाऊस झालाच नाही. आता एका एकरात दोन क्विंटल सोयाबीन झाले तर दहा किलो कापूस झाला. जमीनीत पाणी नसल्याने पेरायचं कस असा प्रश्न हाय. आता पियायला बी पाणी मिळणार नाय, डिसेंबर जानेवारी महिन्यात होणारी परस्थिती आता होतीय आता जगाव कसं तुम्हीच सांगा असे म्हणत श्रीमती झिपरगे यांनी शेतीतील कैफीयत मांडली. शेतातील पिकांची परिस्थिती पाहून लोकप्रतिनिधीही हैराण झाले. दरम्यान, त्यानंतर राहोली, केसापूर, नवलगव्हाण शिवारात भेटी देऊन पाहणी करण्यात आली. 

शासनाकडे सविस्तर अहवाल देणार ः दिलीप कांबळे, पालकमंत्री
जिल्ह्यातील पिक परिस्थितीची जाणीव झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल मंगळवारपर्यंत (ता.२३) शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com