संजय बनसोडेंनी केली 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांची पाहणी

शिवशंकर काळे
Wednesday, 27 January 2021

या मिशन अंतर्गत ते ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

जळकोट (लातूर): तालुक्यातील जळकोट येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे ता.२६ रोजी केली. यावेळी जल जीवन मिशनच्या संचालिका श्रीमती आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी उपस्थित होते.

यावेळी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरदोई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत गावागावांमधील प्रत्येक कुटुंबाला अधिकाधिक प्रति लिटर पाणी कसे मिळेल यावर भर देत आहोत.

अखेर शाळेची घंटा वाजली; पहिल्या दिवशी ३५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात. पण यापुढे शुध्द पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. कारण हीच पंचसूत्री आपल्याला येणाऱ्या काळात तारणहार ठरणार आहे. कारण पाणी आहे तर जीवन आहे असे आपण म्हणतो. त्यामुळे पिण्याचे पाणी स्वच्छ आणि चांगले उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. व या मिशन अंतर्गत ते ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजल्या; शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू

तसेच यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश. सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ,उदगीर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अघ्यक्ष अर्जून आगलावे,शाम डावळे , सोमेश्वर परगे,सुचित मालुसरे, एकनाथ मालुसरे आदि उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Sanjay Bansode inspected the work under Jal Jeevan Mission