जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

जालना ः  दुभाजकावर चढलेली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची कार.
जालना ः दुभाजकावर चढलेली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची कार.

जालना - कोरोना रोखण्यासाठी सतत धावपळीत असलेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या शासकीय वाहनाचा गुरूवारी (ता.१३) किरकोळ अपघात झाला. अचानक ब्रेक लागल्याने अंबड चौफुली ते मोतीबाग बायपास वरील दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातामध्ये जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांना इजा झाली नाही.

अंबड चौफुली ते मोतीबाग या बायपास मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. गुरूवारी (ता.१३) दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे काही कामानिमित्त कार्यालयातून आपल्या शासकीय वाहनाने निघाले होते.

त्यांचा चालक वैद्यकीय कारणामुळे रूग्णालयात गेलेला होता. त्यामुळे कामाच्या लगबगीमुळे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे हे स्वतः कार चालवत होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंबड चौफुलीकडे जात असताना पाठिमागून आलेल्या वाहनामुळे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी गाडीचे ब्रेक लावले.

रिमझिम पावसामुळे रस्ता ओला झाल्याने घसरत गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातामुळे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांना इजा झाली नाही. तसेच गाडीचे ही नुकसान झालेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com